जिल्हापरिषदेवर भाजप येणार : नाम. चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर जिल्हापरिषद निवडणुकीचा धुरळा बसला असून, सध्या सत्ता स्थापनेची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी बेरजेची गणिते बसविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हापरिषदेवर भाजप मित्रपक्षांच्या सहकार्याने सत्ता स्थापन करेल ,असा आशावाद नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सध्या कोल्हापूर जिल्हापरिषदेमध्ये पक्षीय बलाबल असे आहे : कॉंग्रेस १४ , राष्ट्रवादी ११ , भाजप १४ , शिवसेना १० , जनसुराज्य ६ , ताराराणी आघाडी ३ , युवक क्रांती आघाडी २ , आवडे गट २, स्वाभिमानी २ , अपक्ष १ ,असे एकूण ६७ उमेदवार आहेत. सत्ता स्थापनेसाठी ३४ हा आकडा पार करावा लागणार आहे.
यासंदर्भाने सगळेच दावेदार पक्ष आपली बेरजेची गणिते करण्यात व्यस्त आहेत.
याबाबत पत्रकारांशी बोलताना नाम.चंद्रकांतदादा यांनी आपण ४० च्या आकडा पार करू, असा आशावाद व्यक्त केला आहे. तरी येणाऱ्या २१ तारखेला चित्र स्पष्ट होईल.