सामाजिक

छत्रपती शाहू महाराज एक कृतीशील द्रष्टे विचारवंत राजे : प्रा. डॉ. एस. व्ही. नवले

बांबवडे : आज समाजातल्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कृतीशील द्रष्टे विचारवंत राजे होते. सामाजिक समता, न्याय, कृषी, व्यापार, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, अर्थकारण, पर्यावरण, जलसंवर्धन, इत्यादी क्षेत्रातील त्यांचे कार्य देशभर अनुकरणीय ठरले. असे मत प्रा. डॉ. एस. व्ही. नवले यांनी व्यक्त केले.
वारणा कापशी तालुका शाहूवाडी येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित, श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमा पूजन व संस्थेच्या प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. एस.व्ही. नवले बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन सहसचिव डॉ. युवराज भोसले होते.
आपल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.भोसले म्हणाले कि, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू राजांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय व संधी दिली. शाहू राजांची शैक्षणिक धोरणे शिक्षण प्रसारकांनी पुढे चालविली. शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत असताना, त्यांच्या परंपरेत कार्य करण्याचा अभिमान वाटतो. समाजाचे पालकत्व निभावणाऱ्या फुले, शाहू, आंबेडकर अशा महान व्यक्तींना त्यांनी कृतज्ञता पूर्वक अभिवादन केले.
समारंभाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संजय सुतार यांनी केले. समारंभास प्रा. डॉ. व्ही.एस. शिंदे यांचे योगदान लाभले. ज्येष्ठ प्रा. उदय मुंगुर्डेकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्ग समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. निलेश जाधव यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!