शहीद सावन माने, संदीप जाधव या द्वयींच्या स्मरणार्थ बोरपाडळेत रक्तदान
पैजारवाडी : आपल्या देशाचे रक्षण करताना जम्मू-काश्मीर मध्ये पाकिस्तानी लष्कराशी लढताना शहीद झालेले वीर जवान सावन माने, व संदीप जाधव या दोन महाराष्ट्राच्या वीरपुत्रांना श्रधांजली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ, बोरपाडळे इथं रक्तदान शिबीर संपन्न झाले. येथील होतकरू तरुणांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी सी.पी.आर.कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी पथकाला बोलवण्यात आले होते. सकाळी ९ वाजता शहीद जवानांच्या प्रतिमा पूजन करून, शिबिराची सुरुवात करण्यात आली. हे शिबिर जय मल्हार मंगल कार्यालयात संपन्न झाले.
बोरपाडळे, आरळे, सातवे, माले, मोहरे, नावली, देवाळे, पैजारवाडी, व परिसरातील रक्त दात्यांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन स्वेच्छेने रक्तदान केले, आणि भारतमातेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या, त्या दोन वीर पुत्रांना श्रद्धांजली वाहिली. त्याच प्रमाणे बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आशुतोष तराळ, व डॉ.बाबासाहेब पाटील यांनी शिबिराला विशेष भेट देवून तरुणांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले.
प्रथमच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहून रक्तपेढी प्रमुखांनी समाधान व्यक्त केले .
यावेळी रक्त पेढीचे प्रमुख डॉ.दीपक बळवंतकर, जनसंपर्क अधिकारी राजू माने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रशांत सरवदे, सुनीता कांबळे, शशिकांत गुरव, रोहित मोरे, सुशांत हराळे, विजय बावडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याच बरोबर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी उत्तम जाधव, संजय जाधव, वैभव लोकरे, महेश देवकर, सुभाष जाधव, सुनील माने-पाटील, विकास पाटील, सुदीप पाटील, बाबासाहेब पाटील (माले)यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं.सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते