बांबवडे सरपंच विष्णू यादव यांचा तडकाफडकी राजीनामा
बांबवडे (प्रतिनिधी ) : बांबवडे सरपंच विष्णू यादव यांनी दुकानगाळे वाटप प्रकरणी मनमानी कारभार होत असल्याने राजीनामा देत असल्याचे सांगितले.
गेले काही आठवडे दुकानगाळे वाटप लिलावामुळे ग्रामपंचायत मध्ये गोंधळ सुरु आहे. तसेच जिल्हा परिषद,व पंचायत समिती च्या निवडणुकीत विष्णू यादव व नेत्यांमध्ये झालेल्या धुसफूसी मुळे बांबवडेतील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. याचाच काहींनी गैरफायदा घेवून आपले वांगे शिजवण्याच प्रयत्न केलाय. दरम्यान बांबवडे ग्रामपंचायत निवडणुकीवेळी विष्णू यादव यांनी चांगली कामगिरी करत येथील राजकारणात ११ पैकी ६ जागा आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने निवडून आणल्या, व ग्रामपंचायत संजयदादा गटाकडे ठेवण्यात यश मिळवले. या सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकास कामे करत ,साहित्य दिंडी सारखे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून गावची प्रतिष्ठा उंचावली.दरम्यान शेवटच्या सहा महिन्यात उपसरपंच गजानन निकम यांना सरपंच पद द्यायचे ,हे अगोदरच ठरले आहे. त्यामुळे गजानन निकम यांची सरपंच पदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा आहे.