मराठ्यांची आज महागोलमेज परिषद
कोल्हापूर : मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळावे, यासाठी समाजाने अनेक मोर्चे काढले, निवेदने दिली. परंतु शासनावर त्याच काहीच परिणाम होताना दिसत नाही, म्हणूनच मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी विचार मंथन करणे, त्यासाठी कृतीशील आराखडा तयार करणे व शासनाला ह्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणे, यासाठी कोल्हापुरात आज महागोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालास हमीभाव,कर्जमाफी यावर चर्चा केली जाणार असून, हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा नको, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी,अॅट्रॉसिटीचे खोटे दावे रोखणे ,अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.व त्यानंतर पुढील कामांची दिशा ठरवली जाणार आहे.