अरुण सेवा संस्थेच्या चेअरमन पदी श्री कुलदीप डवंग बिनविरोध
बांबवडे : अरुण वी.का.स. सेवा संस्था वाडीचरण तालुका शाहुवाडी च्या चेअरमन पदी श्री कुलदीप डवंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी कुलदीप यांची निवड खऱ्या अर्थाने योग्य निवड मानली जात आहे.अशी जनतेतून चर्चा आहे.
यावेळी माजी चेअरमन बाबुराव बाळू लाड, व्हा.चेअरमन अविनाश माळी, संचालक राजाराम घागरे, राजाराम सावंत, राजाराम लाड, दिलीप सावंत, शिवाजी जवंदाळ, जयराम डवंग, संजय माने, संचालिका सौ.रंजना भावके, प्रतिभा लाड, सरपंच सौ.सुनिता सावंत, माजी सरपंच विजय डवंग, उपसरपंच रायसिंग चौगुले, अविनाश लाड, गणपती लाड, बाबा सावंत, प्रकाश शेटे, संग्राम पाटील, सचिन डवंग, अक्षय लाड, जयदीप डवंग, धोंडीराम भावके, संदीप चौगुले उपस्थित होते. सदर ची निवड संस्था सेक्रेटरी सुरेश कोकाटे यांनी जाहीर केली .