केंद्र शासनाच्या विविध चुकीच्या धोरणाविरोधात एल्गार मोर्चा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) :देशामध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, अशा केंद्र शासनाच्या विविध चुकीच्या धोरणाविरोधात शाहुवाडी तहसीलदार कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

शाहुवाडी पंचायत समिती च्या प्रंगणात असलेल्या विश्व्रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चामध्ये संविधान बचाव, आम्ही सारे भारतीय, संविधान झिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शेकाप चे भाई भारत पाटील मोर्चाला संबोधित करताना म्हणाले कि, देशात अराजकता माजात चालली आहे. बेरोजगारी व महागाई चा आगडोंब उसळला आहे. श्रीमंत, श्रीमंत च होत चालला आहे, आणि गरीब अधिक गरीब होत चालला आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत. मुठभर लोकांसाठी केंद्राची राजसत्ता काम करताना दिसत आहे. देशात एकप्रकारची हुकुमशाही सुरु झाली आहे. राज्यघटना धोक्यात येण्याची वेळ आली आहे. म्हणूनच सरकारला जाग आणण्यासाठी हे एल्गार मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून संविधान वाचवण्याचे काम आपण केले पाहिजे. असेही श्री भाई भारत पाटील यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक रमेश चांदणे, जि.प.चे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रकाश पाटील, नामदेव पाटील, शेकाप चे राजाराम मगदूम, राजेंद्र देशमाने, भारतीय दलित महासंघाचे श्रीकांत कांबळे, प्रा. प्रकाश नाईक, शिवसेने चे दत्ता पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, भारतीय बौध्द महासभेचे प्रकाश कांबळे, हनुमंत कवाळे, प्राध्यापक शिवाप्पा पाटील, वंचित बहुजन आघाडी चे संदीप कांबळे, मराठा महासंघाचे वसंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने, आदींसह मान्यवर उपस्थित होते.