खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?
बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पुन्हा निवडून आलेले खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
शाहुवाडी तालुका हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभव पत्करावा लागला. अशा अटीतटी च्या लढतीत धैर्यशील माने यांनी मात्र आपला गड शाबित राखला. यामागे विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांचे मोलाचे सहकार्य होते.
परंतु हा विजय महायुती च्या दृष्टी ने महत्वाचा असल्याने खासदार धैर्यशील माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास आश्चर्य वाटू नये.