ग्रामीण जनतेच्या गरजेसाठी साईनाथ मल्टीस्टेट कटिबद्ध – चेअरमन श्री उत्तमराव जाधव
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नव्याने सुरु झालेली साईनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. या संस्थेने ग्रामीण भागातील जनतेसाठी सुवर्ण खरेदी कर्ज योजना, याचबरोबर वैद्यकीय मदत योजना अशा अनेक योजना ग्रामीण भागातील जनतेचे आर्थिकमान वाढविण्यासाठी आणल्या आहेत. अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री उत्तमराव आनंदराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
दिवाळी पाडवा या सणाच्या अनुषंगाने संस्थेने पत्रकारांना फराळासाठी निमंत्रित केले होते. यावेळी चेअरमन श्री उत्तमराव जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देखीळ चेअरमन यांनी दिलीत.
यावेळी संस्थेने जनतेसाठी सुवर्ण खरेदी योजना आणली असून आपण जेवढे सोने खरेदी करणार आहोत, त्याच्या ३० % रक्कम संस्थेकडे भरल्यानंतर सोने खरेदी करू शकतो. त्यानंतर उर्वरित रक्कम हफ्त्याने फेडावयाची आहे. तसेच पहिल्या २६२ सभासदांसाठी ५ लाख रुपये किमतीचे अपघाती विमा कवच संस्थेने मोफत दिले आहे. सभासद शुल्क फक्त २५९/-रु. आहे.
संस्थेने आपत्कालीन घटने संदर्भात वैद्यकीय मदत सोने तारण कर्ज या योजनेच्या माध्यमातून जर रुग्णालयासाठी आर्थिक मदत लागल्यास सोने ठेवून ३० दिवसांसाठी बिनव्याजी रक्कम संस्था रुग्णालयाच्या बिलासाठी देणार असून, हि रक्कम ३० दिवसांच्या आत भरल्यास त्या रकमेला व्याज लागणार नाही. त्यापुढे गेल्यास मात्र त्या रकमेचे व्याज सुरु होईल. परंतु आपत्कालीन वेळेसाठी संस्था अचानकपणे धावून लोकांना मदतीचा हात पुढे करणार आहे.
यासोबत अनेक ठेव योजना संस्थेने सभासदांसाठी आणल्या आहेत. येथील कर्मचारी वर्ग प्रशिक्षित आहे. तसेच येथील ठेवींना सुरक्षा संस्थेने निर्माण केली आहे. इथं केवळ सोने तारण कर्ज आणि ठेव योजना असल्यामुळे ठेवींची आणि कर्जाची सुरक्षा अबाधित राखण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. अशी आश्वासक माहिती चेअरमन श्री जाधव यांनी दिली आहे.
यावेळी संस्थेच्या संचालिका सौ सुप्रिया जाधव, संचालक सागर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी खुटाळवाडी चे सरपंच श्री सुदाम चव्हाण यांना विमा कवच चे प्रमाणपत्र देण्यात आले.