घुंगुर येथील बॉक्साईट प्रकल्प संदर्भात लोक्सुनावणी संपन्न
बांबवडे :घुंगुर तालुका शाहुवाडी येथील सावरे वाडी इथं बॉक्साईटउत्खनन प्रकल्प संदर्भात पर्यावरण विषयक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, व भैरवनाथ अर्थ मुव्हर्स अँड कंपनी यांच्यावतीने जाहीर लोक सुनावणी संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील नागरिकांनी इथं मोठा सहभाग नोंदवला. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात एक नवा औद्योगिक प्रकल्प येईल. त्यामाध्यमातून तरुणांसाठी रोजगार व रॉयल्टीच्या माध्यमातून पंचक्रोशीचा विकास होईल. अशी चर्चा बहुतांश उपस्थितांकडून ऐकावयास मिळत होती. हि लोक सुनावणी सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरु झाली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, राजकीय नेते उपस्थित होते. दरम्यान काही मंडळींनी पर्यावरणाचा ऱ्हास होईल .अशी मते नोंदवली.तर अनेकांनी तालुक्यात एक नवे औद्योगिक पर्व निर्माण होत आहे, म्हणून पाठींबा दर्शविला. यावेळी भैरवनाथ अर्थ्मुव्हर्स चे युवराज पाटील म्हणाले कि, या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी च्या माध्यमातून परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. शाहुवाडी तालुक्यात भूमिपुत्राकडून एक नवे औद्योगिक पर्व उभे राहणार आहे, तसेच देशाच्या विकासासाठी खनिज संपत्ती मोलाचा वाटा उचलते. यासाठी हा प्रकल्प उभा रहाणे, म्हणजे हि सुद्धा देशसेवा च आहे. यावेळी इथला तरुण बेरोजगार राहणार नाही, अशी ग्वाही देखील श्री पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, या प्रकल्पाच्या माध्यमातून एक नवा औद्योगिक प्रकल्प तालुक्यात येत आहे. त्याचे स्वागत करणे हि काळाची गरज आहे. करण उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना हे एकमेव प्रकल्प तालुक्यात आहे. त्याच्या जोडीला एक नवा प्रकल्प तालुक्यात येणे, म्हणजे तालुक्याच्या अर्थकारणाला बळकटी देण्यासारखे आहे. म्हणून या प्रकल्पाला आमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर पाठींबा आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, नायब तहसीलदार गणेश लव्हे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.