चांदोली धरणात २१.७५ पाणी साठ
शिराळा प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत कोसळत आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी सकाळी ७ ते गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण ३२ तासात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात १०१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून या परिसरात १२९७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. शिराळा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे.
चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या २१.७५ टीएमसी इतका साठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात प्रति सेकंद ७७४९ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे सध्या वीज निर्मिती केंद्रातून १ हजार६४९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.