मांगले त बेंदूर सण पारंपारिक वाद्यांसह उत्साहात संपन्न
शिराळा : मांगले तालुका शिराळा इथं बेंदूर सण उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपारिक वाद्यांसह बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
गतवर्षी मांगले इथं बेंदूर सणास डॉल्बी लावल्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यंदा बैलांची मिरवणूक पारंपारिक वाद्यांसह काढण्यात आली.आज सकाळपासून बैलांना धुवून त्यांना सजवण्यात बळीराजा व्यस्त होता. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला न्हाऊ-माखू घालत होता. अनेक ठिकाणी बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात पावसाने उघडीप दिल्याने बेंदूर सणात उत्साह प्रतीवर्षापेक्षा अधिक होता.