दि.३० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हेरले येथील विटंबने च्या निषेधार्थ बांबवडे बंद
बांबवडे : हेरले तालुका हातकनंगले जि. कोल्हापूर इथं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बॅनर ची विटंबना केली आहे. विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ उद्या दि.३० एप्रिल २०२३ रोजी बांबवडे बंद ची हाक समस्त हिंदू बांधवांनी दिली आहे. सदरच्या हाकेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, याबाबत कोणतीही शंका नाही. तरीही आपल्या व्यापारी बंधूंना अडचण भासू नये, यासाठी हे निवेदन आहे.

दरम्यान उद्या दि.३० एप्रिल २०२३ रोजी संपूर्ण शाहुवाडी तालुका बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. समस्त हिंदू बांधवांची हि हाक असून, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा अभिमान आहे. हेच आमचं अस्तित्व आहे. या अस्तित्वाला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे पडसाद उमटणारच, यात शंका नाही.

हेरले तालुका शाहुवाडी इथं छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती च्या अनुषंगाने मिरवणूक सुरु असताना समाजकंटकांनी लाईट घालवून त्यांचे बॅनर फाडले. हि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना आहे. आमच्या राजांची विटंबना हा महाराष्ट्र सहन करणार नाही. यामध्ये कोणतेही राजकारण येवू नये, हि अपेक्षा आहे.

तरी उद्या दि.३० एप्रिल रोजी बांबवडे बंद राहील, याची समस्त बांबवडे वासीय तसेच व्यापारी वर्ग यांनी याची नोंद घ्यावी. तसेच पोलीस प्रशासन , प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच हा बंद शांततेच्या मार्गाने असणार आहे. पोलीस प्रशासनाने याबाबत सहकार्य करावे, अशी विनंती हिंदु बांधवांनी केली आहे.