फत्तेसिंगराव नाईक दूध संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह नाईक, तर उपाध्यक्षपदी प्रकाश धस यांची निवड
शिराळा प्रतिनिधी :(संतोष बांदिवडेकर)
बिऊर तालुका शिराळा येथील लोकनेते कै.फत्तेसिंगराव नाईक तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह नाईक तर उपाध्यक्षपदी प्रकाश धस यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.डी. लाड यांनी काम पाहिले.

यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून पुनश्च निवड झाल्यानंतर बोलताना अमरसिंह नाईक म्हणाले कि, लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांनी तालुक्यात धवल क्रांती होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी यांना प्रोत्साहन दिले आहे. तीच भूमिका आपण अध्यक्ष म्हणून भविष्यात घेणार आहोत. आपल्याला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आमदार मानसिंगराव नाईक सर्व संचालक, दूध उत्पादक, कर्मचारी यांच्या सहकार्याने मिळाली आहे. याबद्दल त्या सर्वांचे आभार मानून भविष्यात या संघाचा मोठा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणार आहोत. शेतकरी दूध उत्पादक यांना जास्तीत जास्त नफा संघाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील.

यावेळी युवा नेते संचालक भूषण नाईक,संजय पाटील, श्रीरंग भोसले अनिल पाटील, बबन पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी यमगर, शिवाजी लाड, तुकाराम सावंत, गणेश पाटील, माणिक दशवंत, शरद पाटील, संजय शिंदे, नामदेव पडवळ, लक्ष्मण पाटील प्रणव पाटील, मंगला पाटील, रूपाली पाटील, मनीषा यादव, व्यवस्थापक दिनकर नायकवडी, कार्यकारी संचालक रवींद्र यादव आदी उपस्थित होते.