महायोगी गोरक्षनाथ महाराज मंदिरामध्ये वारकऱ्यांचे स्वागत व स्नेह भोजन
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):
शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथ महाराज मंदिरामध्ये वारकऱ्यांचे स्वागत व स्नेह भोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिराळा येथून पंढरपूरला जाणारी गोरक्षनाथांची दिंडी मानाची असते. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून वारकरी आणि भाविक या पायी दिंडीतून शिराळा ते पंढरपूर चालत जातात. यंदाच्या पालखी सोहळ्यात सर्वजण मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. ऊन, वारा, पाऊस झेलत वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम नामाचा जयघोष करीत भाविक तल्लीन होऊन भक्तिरसात पंढरपूरला प्रयाण करतात.

शिराळा तालुक्यातील भाविकांना व वारकरी संप्रदायातील लोकांना स्नेह भोजन व स्वागत समारंभाचे आयोजन मंदिरामधील संयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भाविक व वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी मठाधिपती पीर पारसनाथजी महाराज, आनंदनाथजी महाराज, सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार विनय कोरे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, माजी आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलिप पाटील, प्रभाकर पाटील, उत्तम निकम, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील सागाव येथील बाळासाहेब पाटील मान्यवर उपस्थित होते.