श्री रामचंद्र कोकाटे यांचे निधन : भावपूर्ण श्रद्धांजली
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील निवृत्त मंडल अधिकारी रामचंद्र बाबुराव कोकाटे वय ८० वर्षे यांचे रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज व पवार परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
स्व. रामचंद्र कोकाटे यांनी महसूल खात्यात नोकरी केली. या अनुषंगाने शक्यतो सामान्य जनतेला महसुली सेवा देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आदर्श मित्र मंडळाच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे उत्तर कार्य गुरुवार दि. १८ जुलै २०२४ आहे.