संभाजीराजे छत्रपती शाहुवाडी पोलीस ठाण्यात दाखल
बांबवडे ( विशेष प्रतिनिधी ) अतिक्रमण मुक्त विशाळगड या आंदोलनाबाबत संभाजीराजे छत्रपती आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास शाहुवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाणे कडून संभाजीराजे यांना अटक केली जावू शकते.
अतिक्रमण मुक्त विशाळगड या मोहिमेला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाने संभाजीराजे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच अनुषंगाने संभाजीराजे शाहुवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, शाहुवाडी पोलीस ठाणे त्यांच्यावर कोणती कलमे लावतात हे लवकरच समोर येईल . त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी देखील आले आहेत.