सरूड म.गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
सरूड प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव आण्णांच्या अथक संघर्षामुळे सर्वांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. त्यांचे ऋण न विसरता तरुणांनी सम्यक परिवर्तनाच्या वाटेवरून अविरतपणे चालत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी केले आहे.
महात्मा गांधी विद्यालय सरूड इथं २००२ च्या बॅच च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळावाच्या अध्यक्षस्थानी भाई भारत पाटील उपस्थित होते. भाई भारत पाटील यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २४ वर्षांनी अनेक मित्र मैत्रिणींची भेट यावेळी झाली, आणि अनेक शालेय आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी शाळेतील वर्गात पुन्हा वर्ग भरविण्यात आला. वर्गाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. मैत्रीचा एक आनंददायी सोहळा या २००२ च्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला.
यावेळी सर्व शिक्षकांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून आपल्या भावनांना वाट करून दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये गुरुवर्य सर्वश्री आर.एल.पाटील, डी.जी.कांबळे, नायकाल पाटील, कुंभार मॅडम, जी.एच. पाटील, ए,डी.पाटील, राजाभाऊ मगदूम, तसेच प्रशांत खामकर, अमोल काटकर, माणिक पाटील, संग्राम थोरात, उमेश घोलप, संजय रोडे, अभिजित पाटील, धनश्री शेठे, अस्मिता कोळेकर, रुपाली पाटील, मीनाक्षी पाटील, रोहिणी काजवे यांसह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. निलेश घोलप यांनी केले. सूत्रसंचालन वेदप्रकाश विंचू यांनी केले . तर आभार अजित पाटील यांनी मानले.