“साईवर्धन” यांची राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई : शाहुवाडी च्या शिरपेचात मानाचा तुरा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील साईवर्धन विक्रम पाटील यांनी राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत कांस्य पदक पटकावून, शाहुवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाहुवाडी सारख्या दुर्गम भागात आजही कौशल्य लपून आहे. या सह्याद्रीने आजही आपल्या कुशीत साईवर्धन सारखे हिरे जोपासले आहेत.
बेंगलोर येथील कंटरिवा स्टेडीयम येथे झालेल्या १३ व्या राष्ट्रीय ज्युनिअर व सब ज्युनिअर पॅरा अॅथलेटीक्स चँपियनशिप स्पर्धेत कोल्हापूर ला तीन पदके मिळाली आहेत. यामधील बांबवडे येथील साईवर्धन विक्रम पाटील यांनी गोळाफेक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने साईवर्धन यांचे हार्दिक अभिनंदन.
स्पर्धेच्या १९ वर्षाखालील गटात साईवर्धन याने कांस्य पदकाची कमाई केली असून. जिल्ह्यातच नव्हे, तर देशात आपल्या तालुक्याचे नाव सुवर्णाक्षराने नोंडवले आहे. सैवर्धन यांनी अगदी लहानपणा पासूनच अभ्यासासोबतच पोहणे, सायकलिंग, ट्रेकिंग सोबत गोळाफेक स्पर्धेत देखील आपले प्राविण्य दाखविण्यास सुरुवात केली.गतवर्षी साईवर्धन यांनी गोळाफेक मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. एकंदरीत सह्याद्रीच्या कुशीत रुजलेल्या या पारसमणीं चे खऱ्या अर्थाने कौतुक करणे गरजेचे आहे.
ज्या प्रेरणेतून हे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उज्वल करतील. बांबवडे येथील विक्रम पाटील यांचे साईवर्धन हे चिरंजीव आहेत. त्या मातापित्यांचे देखील मनापासून अभिनंदन. पुनश्च साईवर्धन यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा.