स्वत:वरचा दृढ विश्वास हेच यशाचे महाद्वार – सौ.राधिका शिंदे
सरूड प्रतिनिधी : स्वत: वर दृढ विश्वास असला पाहिजे,तरच यश संपादन करता येते. हेच यशाचे महाद्वार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. असे मत सौ राधिका शिंदे यांनी केले.
शिरगाव तालुका शाहुवाडी येथील बालदास महाराज माध्य.व उच्च माध्य.विद्यालयात ” शोध सामर्थ्याचा, तयारी स्पर्धा परीक्षेची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भाऊसाहेब सुतार होते. उपस्थितांचे स्वागत एस.टी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जे.एस. गुरव यांनी केले.
यावेळी उपमुख्याध्यापक यु.एस. पाटील, बी.बी. तडवळेकर,प्रा. अरविंद गाडे, व्ही.एन. पांढरबळे, सौ. रोहिणी शिंदे, प्रा. पांडुरंग चौधरी, प्रा. अमित सराटे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सौ. सुरेखा जाधव यांनी मानले.