कापशी च्या अपघातग्रस्त वारकऱ्यांना रणवीरसिंग गायकवाड यांची मिरज रुग्णालयाला भेट
बांबवडे : केरीवडे जिल्हा सांगली इथं वारकऱ्यांच्या दिंडीत बोलेरो घुसल्याने अपघात झाला होता. अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिरज येथील सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उदय सह.साखर कारखान्याचे, तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले युवा नेते रणवीरसिंग गायकवाड सरकार यांनी या रुग्णालयात जावून अपघातग्रस्त वारकऱ्यांना भेट देवून त्यांची विचारपूस केली.

शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील हे १७ वारकरी असून, सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात येते. या रुग्णालयात युवा नेते रणवीरसिंग गायकवाड सरकार यांनी भेट देवून , डॉक्टरांना भेटून विचारपूस केली. जे रुग्ण कोल्हापूर इथं हलविण्यास हरकत नाही , त्यांना हलविण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान रणवीरसिंग यांनी भेट दिल्याने वारकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.