ढोलकीपटू जगन्नाथ फाळके काळाच्या पडद्याआड : तालुका एका कलाकाराला मुकला
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील वारणा कपाशी तील एक कलावंत, ज्याच्या बोटांवर तरुणाई नाचायची. असा बेभान कलाकार जगन्नाथ फाळके काळाच्या पडद्याआड झाले आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतींना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
जगन्नाथ फाळके दादा यांची ढोलकीवर थाप पडली कि, रसिक मंडळी भारावून जायची. त्यांच्या ढोलकी वर शाहुवाडी पंचक्रोशी फिदा व्हायची. सदा मास्तरांच्या बँड मध्ये क्लोरनेट वादन ते करायचे.
फाळके दादा हे हाडाचे कलाकार होते. कारण त्यांच्या ढोलकीवरच्या थापेवर रसिक फिदा व्हायचे . शंभर ची नोट त्यांच्या खिशात आली कि, ढोलकी अशी वाजायची कि, रसिक मोहून जायचे. परंतु कलाकाराच्या वाट्याला संघर्ष हा नेहमीच पाचवीला पुजलेला असायचा. अशा संघर्षातून त्यांनी कला नेहमीच जपलेली होती. अशा कलाकाराचा अंत शाहुवाडी च्या इतिहासात एक पोकळी निर्माण करून गेला. अशा जगन्नाथ फाळके दादांच्या पवित्र स्मृतींना पुनश्च श्रद्धांजली.