जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप
कोडोली प्रतिनिधी:-
जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आज वारणानगर येथे शालेय विद्यार्थिनींना सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे सभापती विशांत महापूरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण विभागातील विद्यार्थिनीना शाळेला जाण्यासाठी चालत किंवा सायकलने जावे लागतंय, पण काही विद्यार्थिनीच्या पालकांना सायकल खरेदी करणे शक्य नसल्याने, त्या विद्यार्थीनीना शाळेला चालत जावे लागते. त्यांचे हे कष्ट कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत २३ सायकलीचे वाटप वारणा-कोडोली परिसरातील विधार्थिनींना करण्यात आले. तसेच पोखले येथील बिरदेव कला क्रीडा मंडळाला सार्वजनिक जेवणाच्या भांड्यांचा सेट देण्यात आला. तसेच जाखले येथील मातंग समाजाला हि अशा प्रकारचा भांड्यांचा सेट देण्यात आला. आज या समारंभात साधारणपणे एकूण ५ लाख रुपये किमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गीतादेवी पाटील, तेजस्विनी शिंदे, अनिल कंदुरकर, कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, वारणा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव, वारणा बँक संचालक डॉ. प्रताप पाटील, वारणा दूध संघ संचालक आनंद कुरणे आदी उपस्थित होते.
For newest news you have to go to see the web and on world-wide-web I found
this web site as a finest web site for newest updates.
Thanks