सामाजिक

गोकुळ च्या गोगवे शीतकरण केंद्रात पर्यावरणपूरक सोलर प्रकल्प -अध्यक्ष श्री विश्वास पाटील

बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील पाटणे रस्त्यावर, कोल्हापूर जिल्हा सह. दुध उत्पादक संघाचे दुध शीतकरण केंद्र आहे. इथं सुमारे ६० लाख रुपये खर्चाच्या सोलर प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन संघाचे चेअरमन श्री विश्वास पाटील उर्फ आबाजी यांच्या हस्ते आज दि.१५ जून रोजी ११ वाजता संपन्न झाले. यावेळी संघाच्या संचालिका सौ.अनुराधा ताई पाटील यांच्यासह श्री.विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील,आदि संचालक ,कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
हा सोलर प्रकल्प मिनिस्ट्री ऑफ न्यू रिन्युएबल एनर्जी न्यू दिल्ली व युनायटेड नेशन डेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट यांच्या सहकार्याने आणि एन.डी.डी.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सर्व शीतकरण केंद्र, गोकुळ प्रकल्प, व शिरोळ सॅटेलाईट डेअरी याठिकाणी सोलर प्रोजेक्ट उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना चेअरमन श्री विश्वास पाटील म्हणाले कि, यापूर्वी संघाने उर्जा बचत व पर्यावरण पूरक असे विविध प्रयोग यशस्वीपणे राबवून देशात नावलौकीक मिळवला आहे. गोगवे शाखेत बसविण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे शाखेला आवश्यक असलेले दररोज १० हजार लिटर इतके ७५ ते ८० सेल्सिअस तापमानाचे गरम पाणी कॅन वॉशर, टाक्या व पाईपलाईन सफाई, बॉयलर फीड वॉटर याकरिता मिळत आहे. यामुळे मे २०१७ मध्ये बॉयलर ला लागणाऱ्या फर्नेस ऑईल ची प्रतिदिनी १०० लिटर ची बचत झालेली असून, पुढील ५ वर्षांमध्ये त्याचा परतावा मिळणार आहे. यामुळे इंधन खर्चात प्रतिवर्षी १० लाख रुपयांची बचत होणार असून पर्यावरणास पूरक असा हा प्रकल्प आहे. तसेच प्रदूषण रोखण्याचे राष्ट्रीय कार्य या माध्यमातून घडत आहे. भविष्यात देखील मल्टी फायर बॉयलर शाखेकडे बसवून ऊर्जेमध्ये मोठी बचत करण्याचा मानस आहे. असे ही, कोल्हापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन श्री विश्वास पाटील यांनी उद्घाटन पर कार्यक्रमात सांगितले. यावेळी या सोलर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विराज शिंदे यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली.
या उद्घाटन प्रसंगी शीतकरण केंद्राचे शाखाप्रमुख श्री सुधाकर पाटील, पर्यवेक्षक सुभाष जामदार, शाखेतील अधिकारी ,कर्मचारी ,व दुध उत्पादक उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!