बोरपाडळे च्या उपसरपंच पदी सौ.संगीता कोळी
पैजारवाडी प्रीतिनिधी :
बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.संगीता संजय कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच संगीता बिरंजे यांनी राजीनामा दिल्यानंतर, या रिक्त पदासाठी सौ.कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक अधिकारी ग्रामसेविका माधुरी साळुंखे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर करून, सौ.कोळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शरद जाधव, देवाप्पा जाधव, संजय कोळी, अशोक कोळी, शिवाजी देवकर, शिवाजी बिरंजे, बाबासो जाधव, अतुल पाटील,जयंसिग पाटील, सर्व ग्रा.प.सदस्य, कर्मचारी,विविध संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.