शाहुवाडी तालुक्यात ११९५ उमेदवार निवडणूक रिंगणात
मलकापूर प्रतिनिधी :
शाहुवाडी तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्र अर्जांच्या छाननी प्रक्रियेत विविध कारणांनी ५ अर्ज अवैध ठरल्याची माहिती नायब तहसीलदार विजय जमादार यांनी दिली.
अवैध ठरलेले सर्व उमेदवारी अर्ज हे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दाखल झाले होते. यामध्ये भेडसगाव , डोनोली, माणगाव, शिवारे, उखळू येथील प्रत्येकी एका उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर येथील ४९ ग्रामपंचायतीच्या रिंगणात सरपंच पदासाठी २१७ तर सदस्य पदासाठी ११९५ अर्ज कायम राहिले आहेत. शाहुवाडी तील जुन्या धान्य गोदामात मंगळवार दि.३ ऑक्टोबर रोजी छाननी प्रक्रिया संपन्न झाली.
यावेळी जी.प. बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, पंचायत समिती सदस्य विजय खोत, अमरसिंह खोत, माजी उपसभापती महादेव पाटील-साळशीकर, परशुराम शिंदे, दीपक जाधव, गजानन निकम, अभय चौगुले, आनंदा अस्वले, अॅड. विक्रम बांबवडेकर, अॅड. शेळके, अॅड. आनंदा चौगुले आदींसह उमेदवार , प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.