गुन्हे विश्व

हुल्लडबाज पर्यटकांना शाहुवाडी पोलिसांचा दणका

मलकापूर प्रतिनिधी :
तालुक्यातील बर्की धबधबा पहाण्याच्या निमित्ताने आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांवर शाहूवाडी पोलिसांनी दंड वसूल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये सांगली, कोल्हापूर परिसरांसह अन्य ठिकाणांवरून पावसाळी पर्यटनाला आलेल्या तेरा पर्यटकांवर विविध कलमाखाली कारवाई करताना, पोलीस पथकाने रूपये तीन हजार पाचशे दंडाची रक्कम वसूल केल्याची माहिती शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली.
अधिक माहिती देताना पो. नि. अनिल गाडे म्हणाले, डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या शाहूवाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. सहाजिकच येथील निसर्गदत्त ठिकाणांकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. सर्वाधिक त्रास सहन करावा लागणाऱ्या स्थानिकांच्या तक्रारी येत राहिल्याने व पर्यटनस्थळ परिसरात पर्यटकांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारच्या बर्की धबधबा परिसरातील पोलीस बंदोबस्तादरम्यान बेशिस्त वाहन चालवतानाच हुल्लडबाजी करणाऱ्या तेरा पर्यटकांवर १२८/१७७, ३(१)/१८१, १३०(९)/१७७, १५०(अ) अंतर्गत कलमानुसार दोशी धरून कारवाई करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील व पो.नि.अनिल आर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार फडतारे, पो. हेडकॉन्सटेबल दाभोळकर तसेच उपविभागीय स्ट्रायकींग फोर्सच्या १२ पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!