‘भाजप ‘ चा सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न : श्री रणधीर नाईक
शिराळा / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी उज्वला गॅस योजनेद्वारे सामान्य लोकांना गॅस मिळवून दिले आहेत. या योजनेद्वारे दोन कोटीहून अधिक मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन वितरीत करून महिल्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले आहे. असे मत जि.प.चे माजी सदस्य रणधीर नाईक यांनी व्यक्त केले. ते रेठरे धरण ता. वाळवा येथे एच. पी. गॅस वितरकांमार्फत मोफत गॅस वितरण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, चांगले व स्वच्छ विचार असणाऱ्या लोकांच्या हातात राज्याची व देशाची सत्ता आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना चांगले दिवस आले आहेत. विकासासाठी लोककल्याणकारी योजना आणून त्यांची प्रभावी आणि पारदर्शक अमंलबजावणी चालू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत या योजना पोहचवून त्याचा लाभ गरजूंनी करून घ्यावा. केंद्र आणि राज्यसरकारने पारदर्शकपणे या योजना राबविल्या आहेत. त्यामुळे पक्षावरचा लोकांचा विश्वास वाढीस लागला.
या कार्यक्रमास शिवाजी केनचे संचालक संजय घोरपडे, डी.के. पाटील, डॉ. मुळीक, विजय मुळीक, शहाजी कांबळे, तानाजी पवार, आबासो वाघमारे या मान्यवरांसह विमल गायकवाड, रुक्मिणी पवार, संगीता पाटील, सुनिता धुमाळ, वैशाली वाघमारे, छाया पवार या महिला लाभार्थी उपस्थित होत्या.