“ तान्हाजी ” चित्रपटातील अवमानास्पद दृश्ये काढावीत- मराठा महासंघ सुनील पाटील थेरगावकर

बांबवडे : अजय देवगन प्रस्तुत “ तान्हाजी ” चित्रपटातील ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह दृश्य तत्काळ हटवावे,अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ शाहूवाडी यासंदर्भाने उग्र आंदोलन करून, चित्रपटास विरोध करेल, यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन जाबाबदार असेल, असे असे अखिल भारतीय मराठा माहासंघाचे तालुका अध्यक्ष सुनील शंकरराव पाटील थेरगावकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

अजय देवगन प्रस्तुत “ तान्हाजी ” हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज व शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर  आधारित आहे.  या चित्रपटात शूरवीर योध्यांचा इतिहास जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्हा मराठी बांधवांना अभिमान आहे. परंतु याच चित्रपटात एका दृश्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्याबद्दल अवमानास्पद दृश्ये चित्रित केली आहेत. हि दृश्ये तत्काळ काढण्यात यावीत. अशा आशयाचे निवेदन देण्यात आल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले. या मागणीसाठी कार्याध्यक्ष अमर पाटील, सुरेश घाटगे, संगम पाटील, प्रदीप नाईक, विजय चिखलकर, सुभाष पाटील आदी मान्यवरांनी मागणी केली आहे.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: