सामाजिक

इथं ओशाळला मृत्यू : प्रकाश निकम यांचे निधन

बांबवडे : मृत्यूला हि मरण यातना होतील, अशी घटना आज दि.२४ मार्च २०२४ रोजी घडली. बांबवडे तालुका शाहुवाडी च्या ग्रामपंचायत चे वरिष्ठ लिपिक प्रकाश भीमराव निकम यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. या घटनेमुळे मृत्यू देखील ओशाळला असेल. परंतु नियती च्या फेऱ्यापुढे कोणाचेच चालत नाही. हेच यावरून सिद्ध होते. प्रकाश निकम यांच्या पवित्र्य आत्म्यास साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, ग्रामपंचायत बांबवडे चे सर्व सदस्य मंडळ तसेच आघाडी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले आणि सहकारी यांनी व्यक्त केली आहे. रक्षाविसर्जन विधी मंगळवार दि.२६ मार्च रोजी बांबवडे इथं सकाळी ९.०० वा. आहे.
प्रकाश निकम एक तरुण ,सालस, आणि विनम्र व्यक्तिमत्व होते. आपले काम यासोबतच ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मान देवून आपले काम इमाने इतबारे करणारे हे व्यक्तिमत्व नियतीच्या फेऱ्यात कसे अडकले, हे कळलेच नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचे आहे. परंतु सर्व सामान्य जनतेला चटका लावणारा हा मृत्यू कोणीच विसरू शकत नाही. नियतीच्या डोळ्यात देखील अश्रू उभे करून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे बांबवडे गावचं रानफुल प्रकाश निकम हे होय. या पलीकडे सर्वच नि:शब्द होत आहे. त्यांच्या पवित्र्य आत्म्यास मुकुंद चंद्रकांत पवार आणि परिवार यांच्याकडून पुनश्च भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!