कोळगाव च्या स्वागत कमानीस स्व. भाऊसो पाटील यांचे नाव देण्याची मागणी
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ): कोळगाव च्या सर्व सामान्य जनतेसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व. भाऊसो पाटील होय. म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाचे नाव स्वागत कमानीसाठी देण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कोळगाव व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.

शाहूवाडी तालुक्याचे कणखर नेते व कोळगाव गावचे भाग्यविधाते कै. भाऊसो पांडुरंग पाटील माजी सरपंच यांचे तालुक्यासाठी तसेच गावासाठी मोठे योगदान लाभले आहे. आणि गावातील सर्व गोरगरीब लोकांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले, तसेच कोणती लागेल ती मदत केली आहे. आणि जिल्हयातील माजी व आजी आमदार, खासदार व इतर जेष्ठ नेते, पदाधिकारी, यांचेशी असणारा सहवास त्यांचा पाठींबा त्यामुळे त्यांचे नाव आजही पंचक्रोशीत घेतले जाते अशा माणसाच्या योगदानामुळे कोळगांव सारख्या तालुक्याशेजारी असणा-या गावचे नाव त्यांचेमुळे मोठे झाले आहे. त्यामुळे आम्ही व इतर गावातील लोकांनी व कार्यकर्ते यांनी तसेच सेवा संस्था, दुध संस्था, तरुण मंडळे, माजी सरपंच, चेअरमन, व कै. भाऊसो पांडुरंग पाटील यांना मानणारा गट व तरुण मंडळे, या ठिकाणी आम्ही सर्व स्वागत कमानीसाठी पाठींबा देत आहोत. असे निवेदन ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच सौ.मंगल पाटील, ग्रामसेवक कोकाटे, सदस्य राहुल माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य चिटणीस जयसिंग पाटील , मा.सदस्य जयश्री गुरव, राजेश पाटील यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.