बांबवडे च्या उपसरपंच पदी श्री दिपक निकम यांची बिनविरोध निवड
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत बांबवडे च्या उपसरपंच पदी मानसिंगराव गायकवाड गटाचे समर्थक श्री दिपक हिंदुराव निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.
ग्रामपंचायत बांबवडे मध्ये कोणताही राजकीय गट तट बाजूला ठेवून श्री महादेव ग्रामविकास आघाडी च्या नेतृत्वाखाली एकत्र येवून हे सदस्य मंडळ निवडून आणण्यात आले होते. या अगोदर या पदावर जनसुराज्य पक्षाचे समर्थक स्वप्नील घोडे-पाटील यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती. त्यांची कारकीर्द संपल्यानंतर श्री दिपक हिंदुराव निकम यांची उपसरपंच पदी बिन विरोध निवड करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी धीरज कांबळे ग्रामसेवक म्हणून उपस्थित होते.
यावेळी माजी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, ज्येष्ठ सदस्य सर्वश्री सुरेश नारकर, विद्यानंद यादव, दिग्विजय पाटील, सौ. मनीषा दीपक पाटील, सौ.शोभा संभाजी निकम, सौ.सीमा शरद निकम, सौ. वंदना बाजीराव बंडगर, सौ. कविता मुकुंद प्रभावळे, सौ. सुनिता विजय कांबळे, या सदस्य मंडळींसह श्री दिपक पाटील, प्रकाश निकम कर्मचारी वृंद ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच श्री दिपक निकम यांची मिरवणूक काढण्यात आली.