बांबवडे नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने आनंदराव केसरे व मुकुंद पवार यांचा सत्कार संपन्न
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील बांबवडे नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष स्थानी आनंदराव केसरे, यांची तर कार्याध्यक्ष पदी मुकुंद पवार यांची निवड झाले बद्दल हा सत्कार संस्थेचे चेअरमन श्री जगदीश खुटाळे, तसेच व्हा. चेअरमन मधुकर बुवा यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी शाल, बुके देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जनरल मॅनेजर सर्वश्री अल्लाबक्ष मुल्ला, तर मॅनेज्र्र सागर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. यावेळी कृषी उपसंचालक पदी अजय मोरे यांची निवड झालेबद्दल त्यांचादेखील सत्कार झाला. यावेळी संस्थेचे कर्मचारी वृंद सुभाष पाटील व इतर सुद्धा उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे संस्थापक बाळासाहेब खुटाळे यांनी देखील शुभेच्छा पोहोच केल्या.