बांबवडे सराफ असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्री.दीपक आनंदा यादव तर उपाध्यक्षपदी श्री.जयवंतराव पाटील यांची निवड
बांबवडे ता. शाहूवाडी येथील बांबवडे सराफ असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्री.दीपक आनंदा यादव तर उपाध्यक्षपदी श्री.जयवंतराव पाटील यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. याचबरोबर संपूर्ण कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली आहे. सर्वच नूतन अध्यक्ष – उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे सा.शाहूवाडी टाईम्स व एस.पी.एस. न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन .
बांबवडे ता.शाहूवाडी येथे शाहूवाडी तालुका सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष श्री.कुंभार आण्णा यांच्या अध्यक्षतेखाली नूतन निवडीची बैठक संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सेक्रेटरी या पदावर श्री.विक्रम रामचंद्र घुंगुरकर व खजानीस या पदावर श्री.अतुल रामचंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडी प्रसंगी शाहूवाडी तालुका सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष श्री. कुंभार आण्णा यांनी यथोचित मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व सराफ बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत श्री.महेश खुटाळे यांनी तर आभार माझी उपाध्यक्ष श्री.बांदिवडेकर यांनी मानले.