मनसे शाहुवाडी च्या सचिव पदी प्रवीण कांबळे यांची नियुक्ती
मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाहुवाडी तालुका सचिव पदी प्रवीण कांबळे यांची नव नियुक्ती करण्यात आली.

या निवड प्रक्रिया वेळी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, धनाजी आगलावे, यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, शिवाजी फिरके पं स. विभाग अध्यक्ष कडवे, वहातुक तालुका अध्यक्ष दीपक चांदणे, अक्षय खेडेकर, संदीप सातोसे, रोहित जांभळे, मिलिंद घोलप, रोहित घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.