मराठा आरक्षण मिळणेसाठी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दि.२९ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं मराठा आरक्षण मिळणेबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दि.२९ ऑक्टोबर २०२३ पासून साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ४० दिवसांच्या अल्टीमेटम नंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुहा उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी बांबवडे एसटी स्थानक शेजारी सकल मराठा समाज शाहुवाडी तालुक्याच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात होणार आहे.
हे निवेदन तुषार पाटील, विजय लाटकर, सचिन मूडशिंगकर, संकेत पाटील, शुभम हावळे, आदी सकल मराठा समाजाच्या वतीने मान्यवरांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यास दिले आहे.