शाहू महाराज ,सतेज पाटील यांना गडावर जाण्यास पोलिसांनी रोखले : चर्चा सुरु
बांबवडे : दि. १४ जुलै रोजी अतिक्रमण मुक्त विशाळगड आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे स्थानिकांना नुकसान सहन करावे लागले आहे. याठिकाणी सांत्वन करण्यासाठी आज दि.१६ जुलै २०२४ रोजी खासदार शाहू महाराज छत्रपती, कॉंग्रेस चे नेते सतेज उर्फ बंटी पाटील, तसेच स्थानिक आमदार डॉ. विनय कोरे हे घटनास्थळी जाण्यासाठी निघाले आहेत.
दरम्यान गडावरील अनेक अतिक्रमणे काल काढण्यात आलीत, तर उर्वरित अतिक्रमणे आज काढण्यात येणार आहेत. दरम्यान अतिक्रमण मुक्त विशाळगड हि मोहीम गडासाठी आहे. परंतु जमावाने गजापूर च्या वाटेवरील रहिवाशांना लक्ष्य केल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही घरे जळालीत , तर काहीजणांची वाहने तोडण्यात आलीत. यामुळे लोकांचे नुकसान झाले. दरम्यान खासदार शाहू महाराज व सतेज पाटील यांना पोलिसांनी गडावर जाण्यास मज्जाव केला आहे.