शिंपे येथील वृक्षतोड उर्जा प्रकल्पासाठी – शाहुवाडी गट विकास अधिकारी
बांबवडे :शिंपे तालुका शाहुवाडी येथील वृक्षतोड सौर उर्जा प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. यासाठी वन विभागाकडून परवानगी घेण्यात आली आहे. अशी माहिती शाहुवाडी गट विकास अधिकारी श्री मंगेश कुन्चेवार यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले कि, हा सौर उर्जा प्रकल्प शिंपे इथं असलेल्या तीस एकर गायरानात उभे करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी येथील गायरानातील झाडे तोडण्यात आली आहेत. हा प्रकल्प मुख्यमंत्री स्तरावरून मंजूर करण्यात आला आहे. याबाबत शिंपे ग्रामस्थ व प्रसार माध्यमे यांना ग्रामपंचायत ने माहिती पुरवावी, असे आवाहन देखील श्री कुन्चेवार यांनी केले आहे.