सुरेश खोत यास ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील भैरेवाडी येथील सुरेश जगन्नाथ खोत वय ४९ वर्षे यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना, रंगेहाथ अटक करण्यात आली. हि घटना १८ मार्च २०२५ रोजी घडली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि , तक्रारदार यांचा मामेभाऊ यांनी सावे तालुका शाहुवाडी इथं जमीन खरेदी केली होती. त्यांच्या कागदपत्रात खाडाखोड झाली होती. ती मी तहसीलदार कार्यालयाकडून दुरुस्त करून देतो. यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील. अशी मागणी सुरेश खोत याने केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतीबांधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्या कार्यालयाने सापळा रचून सुरेश खोत यास रंगेहाथ अटक केली. सदर घटनेबाबत शाहुवाडी तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, सदर प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. तसेच अशा काही घटना घडत असतील, तर याबाबत शाहुवाडी तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल करा. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यांच्याकडे देखील तक्रार दाखल करावी , असे आवाहन देखील तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केले आहे. सदर च्या कारवाई त. श्री शिरीष सरदेशपांडे पोलीस आयुक्त अँटीकरप्शन ब्युरो पुणे, डॉ. शीतल खराडे अप्पर पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो पुणे, श्री विजय चौगुले अप्पर पोलीस अधीक्षक अँटीकरप्शन ब्युरो पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील कोल्हापूर, सह. पो. फौ. प्रकाश भंडारे, व पोलीस कर्मचारी विकास माने, संदीप काशीद, सुधीर पाटील, उदय पाटील, प्रशांत दवणे,अँटीकरप्शन ब्युरो कोल्हापूर सहभागी होते. तसेच वैष्णवी पाटील यांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असेल ,तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.