…स्व.हौसाबाई लोहार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
जांबूर : स्व. हौसाबाई केशव लोहार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शाहुवाडी तालुक्यातील उत्तर विभाग असलेल्या जांबूर पैकी लोहारवाडी इथं रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी करण्यात आले आहे. तेंव्हा रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन काशिनाथ केशव लोहार यांनी केले आहे. स्व.हौसाबाई केशव लोहार या काशिनाथ केशव लोहार यांच्या मातोश्री आहेत. रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र दिले जाईल. याचा उपयोग भविष्यात त्यांच्या कुटुंबियांना अथवा मित्र मंडळींना रक्ताची गरज असल्यास त्यांना मोफत रक्त मिळेल.

जांबूर पैकी लोहारवाडी, हा दुर्गम भाग असलेल्या ठिकाणी वैचारिक पातळी एवढी मोठी असल्याचे या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदानाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाहायला मिळाली. एक काळ असा होता कि, अशा विधींच्या वेळी भांडी वाटप करीत असल्याचे ऐकिवात आहे. परंतु आपल्या आईंची आठवण सामाजिक बांधिलकी तून जपताना काशिनाथ केशव लोहार यांना पाहून आमचा तालुका आजही मनाने किती श्रीमंत आहे. याचे दर्शन झाले. दुर्गम भाग म्हणजे शिक्षणाची वानवा असते,असं गणित असतं. परंतु इथं सुद्धा सामाजिक भान जपणारी माणसं आहेत, हे पाहून समाधान झाले.

या रक्तदान शिबिरादिवशी शिवजयंती आहे. आपल्या दैवताच्या जयंती दिवशी रक्तदान होणे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना रक्तदानातून अभिवादन केल्यासारखे आहे. कारण एकेकाळी याच आपल्या राजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या स्वत:च्या रक्ताची पर्वा न करता एका जुलमी सत्तेला उखडून टाकले. आज तेच रक्त त्यांना सामाजिक बांधिलकीतून परत करताना आपल्याला धन्यता वाटल्याशिवाय राहणार नाही.

हे रक्तदान शिबीर जांबूर पैकी लोहारवाडी इथं श्री काशिनाथ केशव लोहार यांच्या माध्यमातून त्यांच्या आईंच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आमदार विनयरावजी कोरे, सत्यजित देशमुख भाऊ, कर्णसिंह गायकवाड सरकार, केडीसिसी बँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर दादा, दिपक पाटील दादा अध्यक्ष कानसा-वारणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य, बाजीराव शेडगे अध्यक्ष सोनियाजी पतसंस्था शेडगेवाडी, दिनकर लोहार अध्यक्ष महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना शाहुवाडी, अॅड. महेश शेडगे उपसरपंच ग्रा.पं. शेडगेवाडी, सतीश साळी सेवानिवृत्त वन अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच दिवशी रात्री ९ ते ११ कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी ह.भ.प. सौ. धनश्रीताई बोरगे युवा महिला कीर्तनकार नवी मुंबई या सेवा देणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे कार्यवाहक कानसा वारणा वारकरी सेवा संघटना, असून, व्यवस्थापकीय जबाबदारी आदिष्टादेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लोहारवाडी व सर्व जांबूर ग्रामस्थ पार पाडणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन सर्वश्री काशिनाथ केशव लोहार, सर्जेराव बाळ लोहार, नारायण श्रीपती लोहार, हरिबा श्रीपती लोहार, एकनाथ केशव लोहार, संभाजी आनंदा लोहार गुरुजी यांनी केले आहे.
रक्तदानासाठी संपर्क : ८२७५६५९७९७, ७६६६०६६८६४.