सामाजिक

खाजगी बँकांकडून ग्राहकांची लूट ?

कोडोली प्रतिनिधी:-
ग्रामीण भागात अर्थ सहाय्य करण्यासाठी आता काही खाजगी फायनान्स कंपन्या, आणि बँका कार्यरत आहेत. कमीत कमी कागदपत्रं पुरवठा, आणि कमीत कमी वेळेत या संस्था कर्ज पुरवठा करतात. म्हणून ग्राहक वर्ग , अडचणीच्या आणि घाई गडबडीच्या वेळी यांचा आधार घेतात, पण या खाजगी बँका आणि फायनान्स कंपन्या ग्राहकांची अक्षरशः लूट करत आहेत.
कोडोलीच्या आयसीआयसीआय बँकेच्या काही सेव्हींग खातेदारांना तर कसलेही कर्ज न काढता, किंवा कसलाही नेट बँकिंगचा व्यवहार न करता प्रति महा ३९९ रुपयाचा फटका बसला आहे. कोडोलीच्या आयसीआयसीआय बँकेच्या कोडोली शाखेमध्ये वारणेच्या को-जनरेशन प्रकल्पाच्या काही रोजंदारी कामगारांचे खाते, प्रकल्प अधिकाऱ्यांनी उघडले आहे. या खात्यावर त्यांचा मासिक पगार जमा होतो. ही खाती सन २०० ४ साली उघडण्यात आली आहेत. यात साधार पणे २० ते २५ जणांचे मासिक पगार या खात्यानवर जमा होतात. पण गेल्या ८ महिन्यापासून या खात्यामधून कसलीही पूर्व सूचना न देता, या खातेदारांची ३९९ रुपये इतकी रक्कम वजा केली जात आहे. याबाबत सदर खातेदार कडून वारंवार तक्रार करून देखील, हा प्रकार थांबलेला नाही. याबाबत बँकेशी संपर्क साधला असता, बँकेने हे खातेदार ड वर्गात असून यांच्या खात्यावर ३९९ हा सरचार्ज पडत असल्याचे सांगितले. पण हे खातेदार ड वर्गात जाण्याचे कारण विचारले असता, त्यांचा पगार जमा करणारी कंपनी याला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या या उत्तरावर संबंधित खातेदार समाधानी नसल्याने त्यांनी सोमवारी सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करून बँकेला टाळे ठोकणार असल्याचे सांगितले. तसेच श्री राम सिटी फायनान्स कंपनीकडून हि दर साल दर शेकडा ९५ पैसे इतक्या कमी व्याज दरात सोने तारण अशी जाहिरात केली जाते आहे.आणि प्रत्यक्षात तो व्याज दर २२.२ टक्के इतक्या उच्चांकी दरापर्यंत लावला जातो आहे. अशी कोडोलीच्या काही ग्रामस्थांची तक्रार आहे. एकूणच याबाबत ग्राहकांची तातडीची गरज, त्यांचं काहीसं अजाणतेपणे यांचा गैरफायदा घेऊन या खाजगी वित्तिय संस्था अक्षरशः ग्राहकांची लूट करतात हे मात्र नक्की अशीच चर्चा सर्व सामन्यांमधून ऐकावयास मिळत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!