बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना मातृशोक
आसुर्ले (प्रतिनिधी ): श्री बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया पंडितराव पाटील आसुर्लेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
श्रीमती पाटील यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आठ दिवसापूर्वी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळपासून त्यांची प्रकृती जास्तच बिघडली होती. आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे देहावसान झाले.
त्याच्या पश्चात सहा मुले, नातवंडे आणि परिवार आहे.