‘ जय महाराष्ट्र ‘ च्या बस वरील चालक व वाहकावर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा
कोल्हापूर : ‘ जय महाराष्ट्र ‘ लिहिलेल्या एसटी च्या चालक व वाहक यांच्यावर बेळगाव इथं राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आल्यामुळे, सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समिती वर देखील राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार बाबत सीमाभागात संताप व्यक्त केला जात आहे.
कर्नाटकात ‘ जय महाराष्ट्र ‘ बोलण्यास बंदी घातल्यानंतर, महाराष्ट्र शासनाने एसटी वर ‘ जय महाराष्ट्र ‘ लिहिण्याचा निर्णय घेतला. जय महाराष्ट्र लिहिलेली बस कर्नाटकात पोहोचताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या कडून जल्लोष करण्यात आला. जय महाराष्ट्र च्या घोषणा देण्यात आल्या. बसचे चालक व वाहक यांना भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. त्यामुळे बेळगाव मार्केट पोलिसांनी मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. १४३, १४७ आणि १५३ अ कलमाअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकी शासनाच्या विरोधात सिमावार्तीय भागात संतापाची लाट उसळली आहे.