कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून चैतन्य मतीमंद शाळेस देणगी
कोडोली प्रतिनिधी-:
वारणानगर ता.पन्हाळा येथील विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्रामध्ये श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या विविध महाविद्यालयाकडून चैतन्य मतीमंद शाळेस देणगी धनादेश देण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रंसगी, अभियांत्रिकी,फार्मसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था(I.T.I) महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून देणगीचा धनादेश, वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या अध्यक्षा श्री. शोभाताई कोरे उर्फ आईसाहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, व महाविद्यालय करत असलेल्या विविध सामाजिक कार्याचा संक्षिप्त आढावा दिला.
चैतन्य मतीमंद शाळेची स्थापना सन २००३ मध्ये झाली. सध्या शाळेत ७० हून अधिक मुले-मुली आहेत. अद्यापी शाळेला कोणतेही शासकीय अनुदान प्राप्त झालेले नाही, तरीही संस्थेकडून विद्यार्थ्याना मोफत सकाळी दुध,गणवेश व ने-आण करण्यासाठी बसची सोय केलेली आहे. १८ वर्षावरील कर्मचारी शाळेतील मुले राखी, फिनेल,फाईल, आकाश कंदील, गुढी, अक्षता या व अशा अनेक वस्तू तयार करून महाविद्यालय व बाजारपेठांना पुरवतात. ह्या वर्षी झालेल्या मतीमंद मुलांच्याऑलम्पिक स्पर्धेत भारताने फुटबॉलमध्ये सुवर्ण पटकावले. या संघात चैतन्य शाळेचा विद्यार्थी होता. अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
याप्रसंगी, वारणा बझार चे व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. ए. महाजन सर्व संस्थांना धन्यवाद देताना म्हणाले कि, अभियांत्रिकी महाविद्यालयाने फक्त आर्थिक मदत न करता या मतीमंद शाळेतील मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ दिले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यालयीन कामासाठी व विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या फाईली या शाळेतील मुलांनीच बनवल्या आहेत.
आपल्या मनोगतात, मा. श्री. शोभाताई कोरे उर्फ आईसाहेब म्हणाल्या कि, पैशांनी खूप माणस मोठी असतात, पण माणस मनानं मोठी हवीत, आणि अशी माणस आम्हाला वारणेत भेटली, याचा सार्थ अभिमान आहे. कोणतीही शासकीय मदत नसताना सर्व संस्थानी घेतलेल्या स्व पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले आणि सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही सर्वांनी असेच सामाजिक मदतीची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर, फार्मसी चे प्राचार्य डॉ. जे.आय. डिसोझा, (I.T.I) चे प्राचार्य श्री. बी.आय. कुंभार, चैतन्य मतीमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेटे, डिप्लोमा चे प्राचार्य प्रा.बी.व्ही.बिराजदार, इतरसंस्थाचे प्राचार्य, पदाधिकारी, विभागप्रमुख, रजिस्ट्रार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मार्कू मोनीस व प्रा. गणेश कांबळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले, तर ऋतुजा काटे व सलोनी कदम यांनी निवेदन व सूत्रसंचालन केले.