राजकीय

भाजपसोबत कधीच जाणार नाही-खासदार राजू शेट्टी

कोडोली प्रतिनिधी :-
भाजपच्या केंद्राच्या व राज्याच्या सत्तेत कधीच सहभागी होणार नाही. आम्ही जनतेबरोबर राहून शेतकऱ्यांसाठी लढा करू, आणि मंत्रिपदाची कुठली ऑफर स्वीकारणार नसल्याची माहिती, खासदार राजू शेट्टी यांनी कोडोली तालुका पन्हाळा येथे दिली. कोडोली येथे ते आज औपचारिक कार्यक्रमानिमित्ताने आले होते. भाजपाचा घटक पक्ष राहिलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आज केंद्राच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीस अनुपस्थितीत राहिली. शपथविधी सुरू असतानाच प्रसारमाध्यमांच्या काही चॅनेलवर घटक पक्षांना पंधरा दिवसात मंत्रिमंडळात घेणार, अशा पट्या पुढे पढत होत्या. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना चार दिवसांपूर्वी या सत्तेतून बाहेर पडली आहे, त्यामुळे सत्तेत परत जाण्याचा प्रश्न उरत नाही. आम्ही आता शेतकऱ्यांसाठी बाहेर पडलो आहे. यापुढे शेतकऱ्यांसाठीच लढणार आहे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दिडपट हमीभाव मिळावा, बाहेरील आयात थांबवून शेतीमालाला भाव मिळावा .
अशा मागण्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात विकास फुलवणाऱ्या, साध्या मागण्या देखील सरकार पूर्ण करू शकत नसल्याने, आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. व यापुढे अशी फसवणूक मी सहन करणार नाही. आम्ही सत्तेत नसलो म्हणून सरकारला काही फरक पडणार नाही, पण येणाऱ्या निवडणुकीत निश्चित सरकारला फरक पडेल, असे खासदार शेट्टी यांनी याप्रसंगी सांगितले.
कोडोली येथील शाहू कॉलनीतील नवभारत तरुण मंडळाच्या श्रीगणेशाची आरती खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाली .
त्यानिमित्ताने शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक विलास पाटील, स्वप्नील सातवेकर, विरेद्र पाटील यांसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!