वाकुर्डे खुर्द मध्ये रक्तदान शिबीर संपन्न
मलकापूर प्रतिनिधी :
वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात गावातील युवक आणि नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला. यात्रेचं औचित्य साधून गावातील युवकांनी रक्तदान शिबीराचं आयोजन केल होतं.
प्रारंभी माजी उपसरंपच डॉ राजाराम पाटील यांच्या हस्ते आणि गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचं उदघाटन करण्यात आलं. प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांनी रक्त संकलन केले.
या रक्तदान शिबीरात सुमारे पंचवीस जणांनी रक्त दान करून ग्रामीण भागात एक आदर्श उपक्रम यशस्वीपणे गेले दोन वर्षापासून राबविलेला आहे. या वेळी शिराळा पंचायत समितीचे सभापती सम्राट नाईक, भूषण नाईक ,रामराव जाधव, माजी सरपंच तानाजी जाधव, माजी गाम्रपंचायत सदस्य यशवंत जाधव, दिपक जाधव, विश्वास कुंभार, महादेव जाधव, आकाराम जाधव, तुकाराम जाधव, शिवाजी जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश जाधव ,संजय पाटील आदिंसह युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.