१७ जुलै ला ” राष्ट्रपती ” पदाची निवडणूक
मुंबई : येत्या १७ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
या निवडणुकीसाठी १४ जूनला आयोगातर्फे अध्यादेश जारी केला जाणार आहे. २८ जून या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून या अर्जांची २९ जून या दिवशी छाननी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ जुलै असणार आहे. तर मतमोजणी २० जुलै या दिवशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विशेष निवडणूक पेन वापरला केला जाणार आहे. मतदान करताना वेगळा पेन वापरला गेला तर ते मत अवैध मानले जाणार आहे. निवडणूक आयोगातर्फेच या खास पेनाचा पुरवठा केला जाणार आहे. अशीही माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी दिली आहे.