संघर्ष यात्रेच्या विरोधात “संवाद यात्रा” : मुख्यमंत्री
मुंबई : विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेला ते स्वतःच जबाबदार असून, त्यांच्यामुळेच आज शेतकऱ्यांवर हि परिस्थिती आली आहे. संघर्ष यात्रा स्व.गोपीनाथ मुंढे नी काढली होती. त्यातून परिवर्तन झाले. परंतु आज जे संघर्ष यात्रा काढत आहेत ,ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांना घेवून काढत आहेत. त्यांची संघर्ष यात्रा असेल, तर आमची संवादयात्रा आहे. अशी टीकेची झोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उठवली.
ते पिंपरी इथं भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांना मिळालेली पॅकेजेस याच नेत्यांनी लाटल्यामुळे आज शेतकऱ्यांवर हि पाळी आली आहे. तेंव्हा भाजप च्या सर्व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधावा, असे आवाहन हि मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी यावेळी केले.