Recent

वारुळच्या पुलावरून स्विफ्ट गाडी नदीत कोसळली : सुदैवाने सर्वजण सुखरूप

मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यातील वारूळ गावच्या हदीतील भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट गाडी पूलावरून कडवी नदीत कोसळली.दैव बलवत्तर म्हणूनच तिघे बचावले.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी कि, अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान, रा सर्व जन इंचलकरंजी हे तिघे मित्र इंचलकरंजी हुन आपली स्विफ्ट गाडी क्रमांक MH09 2349 वरुन कोल्हापूर रत्नागेरी महामार्गावरून पावसाळी पर्यटनासाठी शाहूवाडी तालुक्यातील केर्ले धबधबा पाहण्यासाठी जात होते . गाडी वारूळ गावच्या हद्दीतील वळणावर भरधाव वेगाने आंब्याकडे जात असताना डाव्या साईटने गाडी सरळ कडवी नदीत पूलावरून खाली कोसळली. चालकांने प्रसंगावधान राखून गाडीचे दरवाजे उघडले. त्यामुळे गाडीतील अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान हे सर्वजन नदीच्या पाण्यात पडले पूलावरुन गाडी नदीत पडल्याने मोठा आवाज झाला.
वारूळ गावातील ग्रामस्थांनी तातडीने नदीतीलं पूराच्या पाण्यात उतरून तिघांना सुखरुप बाहेर काढले . दैव बलवत्तर म्हणून हे तिघे जण बचावले दोन वर्षापूर्वी याच पूलावरून गाडी नदीत पडली होती . या मार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत . साईड पट्टया भरलेल्या नाहीत . त्यामुळे नेहमी अपघात होत असतात. यावेळी केशव सपकाळ, प्रकाश पाटील, किरण परीट, रावजी पाटील, परशुराम मिरजकर, संतोष पाटील, बंडू आरसेकर आदी युवकांनी मदत केली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!