वारणा महाविधालयमध्ये “मोडी लिपी”अभ्यासक्रमास शुभारंभ
कोडोली प्रतिनिधी
वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्यावतीने “मोडी लिपी”, अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मार्गदर्शक म्हणून मोडी लिपीचे संशोधक व अभ्यासक श्री उदयसिंह राजेयादव आणि श्री चंद्रशेखर काटे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे होत्या. समन्वयक प्रा. उमेश जांभोरे यांनी अभ्यासक्रम सुरू करण्यामागील भूमिका सांगितली.
” शिवकाल ते शाहू काल ” पर्यंतची संशोधनाची सर्व कागदपत्रे अभ्यासण्यासाठी मोडी लिपीचा अत्यंत उपयोग आहे. .खऱ्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी मोडी लिपी शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील एकूण सतरा विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून, अभ्यासक्रम एक महिना कालावधीचा आहे. या निमित्ताने मोडी लिपीचा उदय, विकास, इतिहास आणि अध्ययनाची साधने,ऐतिहासिक घडामोडी विद्यार्थ्यांना जाणून घेता येतील .
दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या, या कौशल्य विकासात्मक अभ्यासक्रमा शिवाय व्यक्तिगत सौंदर्य संवर्धन, बेसिक इंग्रजी ग्रामर, बेसिक ड्रॉइंग अँड पेंटिंग, सुगंधी वनस्पतींची ओळख व व्यावसायिक दृष्टिकोन हेही अल्प कालावधीचे अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहेत .
विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू केल्याचे प्राचार्यांनी सांगितले .
मुख्य समन्वयक प्रा. दिनेश पाटील यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. उमेश जांभोरे यांनी केले. या वेळी प्रा. रोहित बसनाईक उपस्थित होते . ऋषिकेश पाटील यांनी आभार मानले.